प्रतिनिधी शरद कुकुडकर
गोंडपिपरी:
भारतीय जनता पार्टी गोंडपिपरी तालुका मंडळाचे अध्यक्ष दीपक सातपुते यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या सुचनेनुसार आज आपल्या गोंडपिपरी तालुका मंडळाच्या भाजप कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नावे जाहीर केली आहेत.
त्यानुसार गोंडपिपरी भाजपच्या तालुका उपाध्यक्ष पदी सुहास माडुरवार, विजय शेरकुरवार, सुनील विरुटकर, चंद्रकला भोयर, सुनिता येग्गेवार, पोचमल्लू उल्लेंदला तर सरचिटणीस पदी निलेश संगमवार, सतीश वासमवार, नीलेश पुलगमकर, भानेश येग्गेवार आणि चिटणीस म्हणून संजय कोमावार, सुरेखा पिपरे, माधुरी गेडाम, नीलिमा कंदीकुरवार, संजना अम्मावार, योगिता वडस्कर व कोषाध्यक्ष पदी शितील लोणारे तर कार्यकारणी सदस्य पदी किशोर कोठारे, दत्तुजी धुडसे,अमोल बावणे, लक्ष्मण येलमुले, संजय येलमुले,मारोती शेंडे,यादव खेकारे, शाम पिपरे व सत्यवान कांबळे यांच्या नावांची घोषणा केली आहे.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. अशोकजी उईके, माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष मा. हंसराजभैय्या अहिर, आमदार देवरावदादा भोंगळे, जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष अमर बोडलावार, भटक्या विमुक्त जाती सेलचे जिल्हाध्यक्ष हितेश चव्हाण, तालुकाध्यक्ष दिपक सातपुते,
माजी जि. प. सदस्य वैष्णवी बोडलावार, स्वाती वडपल्लीवार, कल्पना अवथरे, जेष्ठ नेते दिपक सा. बोनगिरवार, बबन निकोडे,नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, राकेश पुन, गटनेते चेतनसिंह गौर,
आदींनी अभिनंदन केले आहे.