नवनियुक्त ग्रा.पं.अधिकारी यांचे पुष्पगुच्छ व अशोकाचे वृक्ष देऊन स्वागत

457

जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील ग्राम पंचायत माराई पाटण येथे नवनियुक्त ग्रा.पं.अधिकाऱ्याचा पदभार स्वीकारलेले विकास सूर्यवंशी यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते बळीराम काळे, माजी उपसरपंच प्रल्हाद काळे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप काळे यांच्या वतीने ग्रा.पं. अधिकारी विकास सूर्यवंशी यांचे पुष्प गुच्छ व अशोकाचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.
“फस्ट आणि बेस्ट; या म्हणी प्रमाणे आणि ज्यांच्या नावातच विकास आहे असे ग्रा.पं.अधिकारी विकास सूर्यवंशी आमच्या ग्राम पंचायतीला लाभले आहेत. त्यांचे हातून गावांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळण्यासाठी ते प्रयत्न करतील अशी आशा यावेळी अनेकांनी व्यक्त करून दाखवली. याप्रसंगी सामजिक कार्यकर्ते विजय काळे, किशोर कांबळे, बालाजी पडोळे, प्रतिष्ठित नागरिक भीमराव करपते, अक्षय कांबळे, ग्रा.पं.पाणीपुरवठा कर्मचारी बालाजी कांबळे, ग्रा.पं.शिपाई व्यंकटी कांबळे यासह गावातील अनेकांची उपस्थिती होती.