लग्नाचा वाढदिवस आनंदवन येथील वयोवृध्दांसोबत साजरा…

537

वरोरा: आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले प्रमोद नामदेवराव नागापुरे आणि त्यांच्या पत्नी विमा अभिकर्ता शारदा नागापुरे यांनी समाजसेवेचा वसा घेतला आहे.

समाजात जीवन जगत असताना
समाजाला काही देणं लागतो असे समजून ते गोरगरीब जनतेच्या, लग्नप्रसंगी, वाढदिवसा प्रसंगी, गोरगरीब कुटुंबांना,फुल नाही फुलाची पाकळी म्हणून यथाशक्ती मदत करीत असतात.
असे व्यक्तिमत्व प्रमोद नामदेवराव नागापुरे व पत्नी शारदा नागापुरे यांनी आपला लग्न वाढदिवस आनंदवन येथील सावली मध्ये राहणाऱ्या वृद्ध पुरुष व महिला यांना टरबूज व खरबूज कापून वाटप करून लग्नाचा वाढदिवस साजरा केला
यावेळी महारोगी सेवा समिती आनंदवन चें विश्वस्त डॉक्टर विजय. पोळ, आनंदवन ग्रामपंचायतचे उपसरपंच शौकत खान, आरोग्य सेविका कीर्ती लोहकरे, सरला चौधरी उपस्थित होते.