प्रचारासाठी नेते व्यस्त तर महिला पाण्याअभावी त्रस्त… जिवती तालुक्यातील पाण्याची पातळी खालावली

341

बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली आहे.मात्र प्रशासन निवडणुक यंत्रणेत कार्यरत आहेत तर खेडो पाड्यातील नेते आपपल्या उमेदवाराच्या प्रचाराला वेस्त झालेले आहेत. यामुळे दुर्मिळ दुर्गम भागातील मूळ समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे आढळून येते आहे.
जील्हातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील असंख्य गावांमध्ये बिकट ,वाईट पाणी टंचाई परिस्थितीचा सामना स्थानिक नागरिकांना व महिलांना करावा लागतो आहे. जिवती तालुक्यातील लंबोरी,ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गाव कुरसनगुडा ,भुरीयेसापुर,या आदिवासीबहुमुल भागात पाण्यासाठी फ्कत दोन बोअरवेल आहेत.पण त्या दोन्ही हातपंपला एक गुंड ते दोन गुंड/घागर पाणी येत आहे.त्यामुळे परत घागर भरण्यासाठी कमीत कमी दोन दोन तास वाट पाहत राहावी लागते,यामुळे स्थानिकांसमोर बिकट पाणीपरिस्थिती निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी याची तक्रार ग्राम पंचायतला केली आणि ग्रामपंचायतीने पंचायत समिती कार्यालय तसेच तहसील कार्यालयपर्यंत पाठपुरावा करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही.
सद्या येथील लोकप्रतिनिधी आपपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात या गावावरून त्या गावावर फिरत आहे.स्थानिक नागरिकांच्या समस्या निकाली काढण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत.स्थानिकांना बिकट निर्माण होणारी पाणीसंमस्या लवकरात लवकर सोडवावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात स्थानिक नागरिकांना घेऊन घागर मोर्चा काढू,असा तीव्र इशारा सामाजिक कार्यकर्ते भुसन फुसे यांनी दिला आहे.