चंद्रपूर – समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक किशोर प्रल्हादराव नगराळे यांचा सपत्नीक सत्कार करुन मा.नगराळे सरांना ‘ समाजरत्न ‘ पुरस्काराने गौरान्वित करण्यात आले.दि.७/४/२०२४ ला खोब्रागडे कॉम्प्लेक्स मधील मृणालगिरी सभागृह, चंद्रपूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.सय्यद रमजान अली,सह उद्घाटिका आयु.मायाताई मोहुर्ले, गडचिरोली हे होते. संघटनेचे राज्याध्यक्ष मा.रुपेश वालकोंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॉल इंडिया समता सैनिक दलाचे मा.डॉ.प्रजेश घडसे सर व भारतीय बौध्द महासभेचे चंद्रपूर जिल्ह्याचे संघटक मा.आनंदराव जांभुळकर हे होते.स्वागताध्यक्ष मा.विनोद बच्चलवार, मा.लक्ष्मणराव मोहुर्ले, धम्मराव तानादू,विजय देवतळे, राकेश पोहरकर,विनोद आसमपल्लीवार, संघर्ष नगराळे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ येथून बरेच लोक उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. स्वप्नील मेश्राम यांनी केले,तर आभारप्रदर्शन आयु.सुनिता नगराळे यांनी केले.







