इन्स्पायर मॉर्डन इंग्लिश मिडियम स्कूल आलापल्ली येथे वार्षिक संमेलनाचे आयोजन..

511

प्रितम म.गग्गुरी(उपसंपादक)

आल्लापल्ली : येथील इन्स्पायर मॉर्डन इंग्लिश मिडियम स्कूल येथे दिनांक २८ डिसेंबर २०२३ ते ३० डिसेंबर २०२३ ला कालावधीत वार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा संमेलनाचे उद्घाटन धनंजय कांबळे (गट शिक्षण अधिकारी) यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दिनेश भुसकळे (मुख्याध्यापक, चाणक्य मंतीमंद विद्यालय) उपस्थित होते.

२८ आणि २९ डिसेंबर ला मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले तर उद्या ३० डिसेंबर ला आनंद मेळावा चा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वरूप गावडे (मुख्याध्यापक, इंग्लिश मिडियम स्कूल) उपस्थित होते.

उद्घाटन सत्र कार्यक्रमाचे संचलन अश्विनी सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन पूजा येरमे यांनी केले. कार्यक्रमाला सहाय्य सारिका नरपूरवार यांनी केले.