स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलच्या खेळाडूंनी विभागीय थ्रोबाॅल क्रीडा स्पर्धेत तृतीय स्थान पटकावले

372

राजुरा: विभागीय शालेय थ्रोबाॅल क्रीडा स्पर्धेत बामणवाडा-राजुरा येथील स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलच्या खेळाडूंनी विभागीय शालेय स्पर्धेत तृतीय स्थान पटकावले
क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद वतीने, जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय शालेय थ्रोबाॅल स्पर्धेत शाळेच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने भाग घेतला. यात गोंदिया संघाचा 2-0 डावाने पराभव केला व संघाने तृतीय स्थान पटकावले यात संघाची कर्णधार कु. श्रिया चौधरी, मानसी वांढरे, अनुष्का फरकाडे, खुशी रामटेके, आशना सिंह, अक्सा अजानी, निहारिका सातपुते, त्रिशा राजूरकर, सायली सिंदे, प्रतिक्षा वडस्कर, वैष्णवी वडस्कर व माही दुरुगकर या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. कु. श्रिया चौधरी हिची राज्य स्तरीय निवड चाचणी करिता निवड झाली. कु. स्टेला पीटर हिची सुध्दा 17 वर्षाखालील मुलींमध्ये राज्य स्तरीय निवड चाचणी करिता निवड झाली. या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री भास्कर फरकाडे, प्रज्ञा मॅडम, अश्वती मॅडम, निलम मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर प्रभा डी. एम, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड, थ्रोबाॅल संघटनेचे सचिव डॉ. राकेश तिवारी, शाळेचे सर्व शिक्षक वृंध व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व भविष्यात ही अशीच कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या.