वीज कर्मचारी नितीन राव हे अंबेसडर पुरस्काराने सन्मानित… मुंबईच्या न्यूज चॅनेल द्वारा गौरव

220

चंद्रपूर -स्थानिक चंद्रपूर वीज केंद्रात अग्निक ह्या पदावर प्रदीर्घ सेवारत कर्मचारी श्री नितीन राव ह्यांना आजवरच्या सामाजिक बांधिलकी व विधायक कार्याबद्दल मुंबईला एका विशेष कार्यक्रमात अंबेसडर सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाला माननीय खासदार कोटक, महापौर मस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.
शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित झालेले ते वीज केंद्राचे पहिले कर्मचारी आहेत.
त्यांच्या ह्या पुरस्काराबद्दल विविध कामगार संघटना, देवराव कोंडेकर, श्रीराम पान्हेरकर सह अनेकांनी कौतुक केलेले आहे.