Home गोंडपीपरी अडेगांव ग्रामपंचायतचे नवीन प्रभारी ग्रामसेवक .संतोष घाटे यांचे स्वागत आजपासून ग्रामपंचायतच्या...

अडेगांव ग्रामपंचायतचे नवीन प्रभारी ग्रामसेवक .संतोष घाटे यांचे स्वागत आजपासून ग्रामपंचायतच्या दप्तरी कामकाजास सुरुवात….

687

 

अडेगांव:  ग्रामपंचायतिचे यापूर्वीचे ग्रामसेवक  पी डी राऊत यांनी काही खाजगी कारणास्तव स्वतःची बदली करून घेतल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतिचा कामकाजाचा कार्यभार प्रभार श्री.संतोष घाटे यांनी स्वीकारला. दरम्यान आज दिनांक २७-७-२०२३ रोजी सकाळी १२:०० वाजता अडेगांव ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. आज मासिक सभेच्या निमित्ताने नवीन प्रभारी ग्रामसेवक श्री.संतोष घाटे यांचे ग्रामपंचायतच्या कमिटीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गाव विकासाच्या दृष्टिकोनातून आपण उत्कर्षाने काम करून कमिटीला व गावकऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे नवीन प्रभारी ग्रामसेवक संतोष घाटे यांनी सांगितले.यावेळी सरपंच रेखाताई चौधरी,उपसरपंच विजय चौधरी,सदस्य शालिक झाडे, सदस्य संतोष कोवे, सदस्या अल्काताई नागापुरे, सदस्या संगीता सातपुते, शिपाई श्रावण रायपुरे, संगणक चालक नरेश झाडे, पाणी पुरवठा अरविंद चनेकर उपस्थित होते.

Don`t copy text!