Homeचंद्रपूरजिवतीमतीमंद युवतीवर अतिप्रसंग ; आरोपीला अटक तालुक्यातील आंबेझरी येथील घटना ...

मतीमंद युवतीवर अतिप्रसंग ; आरोपीला अटक तालुक्यातील आंबेझरी येथील घटना बळीराम काळे, जिवती

जिवती (ता. प्र.) : तालुक्यातील उप पोलिस स्टेशन पिट्टीगुडाच्या हद्दीतील आंबेझरी येथिल एका ४४ वर्षीय नराधमाने आदिवासी कोलाम जमातीच्या पिडीत १९ वर्षीय मतिमंद मुलींवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली.

शरफोदीन शबीर शेख (४४) असे आरोपीचे नाव असून याबाबत उप पोलीस स्टेशन पिट्टीगुडा येथे सोमवारी रात्री उशिरा आरोपी विरुद्ध कलम ३७६ (१), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एल), ४५० भांदवी सहकलम ३ (I) (W) (i) (ii), ३ (२) (va) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार संरक्षण अधिनियम १९८९ सुधारणा २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पिडीत १९ वर्षीय मतिमंद मुलगी घरात एकटीच असल्याची संधी पाहून पिडीत मुलगी मतिमंद आहे हे माहीत असतानाही तिच्या मतिमंदाचा फायदा घेऊन ४४ वर्षीय नराधमाने त्या पिडीत मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना तालुक्यातील आंबेझरी गावात घडली. पुढील तपास एसडीपी साखरे राजुरा करत आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!