Home चंद्रपूर किरीट सोमय्या यांच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा शिवसेना कार्यालयासमोर तीव्र आंदोलन…

किरीट सोमय्या यांच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा शिवसेना कार्यालयासमोर तीव्र आंदोलन…

1126

चंद्रपूर –  जुलै २०२३ रोजी भाजप नेते किरीट सोमय्या याच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा शिवसेना कार्यालय समोर जिल्हाप्रमुख संदिप भाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी किरीट सोमय्या याच्या विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली. व किरीट सोमय्या फोटो ला जोडे मारून काळे फासण्यात आले.

या निषेध आंदोलनावेळी शिवसेना माजी महानगर प्रमुख प्रमोद पाटील, उपजिल्हा प्रमुख शालिक फाले, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्निल काशीकर, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, युवासेना युवती सेना सहसचिव रोहिणी ताई पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, जिल्हा समन्वयक विनय धोबे, जिल्हा चिटणीस सुमित अग्रवाल, उपसरपंच प्रज्योत पुणेकर, महिला आघाडी शहर संघटीका वर्षा ताई कोठेकर, माजी जिल्हा संघटीका उदार ताई, राहुल विरुटकर, गणेश ठाकूर ,सिकंदर खान, रिझवान पठाण, हेमराज बावणे, वैभव काळे , शिवा वजरकर,समीर कुरेशी,अक्षय बेलखोडे अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थित होते.

Don`t copy text!