धक्कादायक…..काठीने वार करुन पोटच्या मुलानेच केला जन्मदात्या आईचा खुन… बेनोडा (माटोडा) येथील घटना….

611

आर्वी: तालुक्यातील बनोडा (माटोडा ) येथे पोटच्या मुलानेच काठीने वार करुन जन्मदात्या आईचा खुन केला. ही घटना मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली. कौशल्या महादेव तुमसरे (वय ८२)असे मृत महिलेचे नाव आहे. ८२ वर्षीय कौशल्या दोन्ही पायांनी अपंग होती. यामुळे ती जमनिवर घासत घासत चालायच्या.मृत कौशल्या आणि कौशल्याचा मुलगा हेमराज यांच्यात काही कारणावरुन वाद झले.तो वाद विकोपाला जाऊन हेमराज याने त्याची आई कौशल्याचा खुन केला. या प्रकरणी आरोपी हेमराज तुमसरे (वय ४२) याच्यावर आर्वी पोलीसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. या घटनेची माहीती मिळताच आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी व त्यांचे सहकारी यांच्यासह घटनास्थळ दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत मृत कौशल्या तुमसरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. हेमराज हा मागील दोन दिवसांपासून चिडचिड करत होता. त्यामुळे त्याची पत्नी,मुलगी, भासरे रंगवत तुमसरे यांच्या घरी झोपायला गेले होते.घरी हेमराज व त्याची आई कौशल्या घरी होते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास विजपुरवठा खंडीत झाला.अशातच काठीणे मारहान केल्याचा आवाज आला. हेमराज याच्या घराचे दार उघडण्यात आले तेव्हा हेमराज हा त्याच्या जन्मदात्या आईलाच काठीणे मार करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शीयांना दिसले. यामुळे पोलीसांच्या तपासात ही घटना उगडकीस आली.