दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा नदीत आढळला मृत्युदेह

1213

चंद्रपूर: पोंभूर्णा तालुक्यातील मोहाळा (रै.) येथील शेतकरी देवराव गणपती वांढरे हे मागील दहा दिवसांपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ते कुठेच आढळले नाही. तब्बल दहा दिवसांनंतर नदीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

देवराव वांढरे हे ९ मे २०२३ ला पहाटे चार वाजताच्या सुमारास घराबाहेर पडले. तेव्हापासून ते घरी पोहचलेच नाही. संबंधिताच्या कुटुंबीयांनी व नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध केली. यानंतर पोंभूर्णा पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली. मात्र तब्बल दहा दिवसानंतर गावाजवळील नदीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. पोंभूर्णा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.