देश उध्वस्त होण्याच्या मार्गावर…राष्ट्रभक्त मतदारांनो देश वाचविण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा कर्नाटक निवडणूक प्रचार सभा – माजी मंत्री वडेट्टीवारांची तोफ कडाडली

852

चंद्रपूर:  देश नही झुकने दुंगा म्हणणारे आता देश विकायला लागले आहे. संपूर्ण देशात हुकूमशाही व दंडूकेशाहीचलचे राज्य आणण्याचा माणस ठेवत व्यापारी हीत जोपासून केंद्रीय संस्थांना हाताशी घेत विरोधकांना संपविण्याचे षडयंत्र आखनाऱ्या कटकारस्थानी भाजप सरकारने संपूर्ण राष्ट्राला देशोधडीला लावण्याचे कार्य सुरू केले आहे. येथे पूर्वी नांदणारी धर्मनिरपेक्षता, समता , व बंधुत्वता धोक्यात आली असून देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या मतदान रुपी शस्त्राने राष्ट्रभक्त मतदान म्हणून आपण काँग्रेसचे पाठीशी उभे राहावे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते कर्नाटक राज्यातील निपाणी मतदार संघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पांडुरंग पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

कर्नाटक राज्यात निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. याप्रसंगी निपाणी मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार सभेकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदार संघाचे आमदार विजय वडेट्टीवार तथा कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे नेते यावेळी मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना माजी मंत्री आ.वडेट्टीवार म्हणाले की, देशात भाजपाने सत्ता काबीज करताच लहान उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांना वेठीस धरून दोन बड्या व्यापाऱ्यांना धनवान करण्यासाठी कोट्यावधींचे कर्ज देऊन सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटा घेतला. भाजपाने जोपासलेले व्यापारी हित यामुळे देशात महागाई बेरोजगारी च्या विळख्यात सापडून सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल अपेष्टा होत आहे. महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यासाठी धूर्त नीतीने भाजपाने केंद्रीय स्वायत संस्थांना हाताशी घेऊन विरोधी बाकावरील नेत्यांना जेलवारीची धमकी देत फूट पाडण्याचे कटकारस्थान रचले व त्यात यशही प्राप्त केले. देशातील सर्व सामान्यांच्या पैशाचा गैरवापर करून कोट्यावधींच्या उलाढालीतून भ्रष्ट भाजप नेत्यांनी सरकार पाडण्यासाठी विविध शक्कली लढविल्या. अशाच प्रकारच्या राजकारणातून कर्नाटक राज्यामध्ये सत्ता काबीज करण्याचे षडयंत्र रचले गेले असून देशातील सर्व सामान्यांची लोक वाहिनी रेल्वे आता विकण्याच्या मार्गावर आहे. तत्पूर्वी अनेक विमानतळे विकल्या गेलेली आहे. कर्नाटक राज्यातील नागरिकांशी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे ऋणानुबंध आजही कायम असून छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मोठा वर्ग कर्नाटक राज्यात आहे. येदीयुरप्पा सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण वाटा मिळावा याकरिता प्रयत्न चालविलेले असून कर्नाटक राज्यात विविध प्रकारे मत विभागणीचे चाळे सुरू केले आहे. भाजपा सरकार विरोधात पुलवामा हल्ल्या संदर्भात माजी राज्यपालांनी महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत ताशेरे ओढले. तर वीरमरण पत्करणाऱ्या चाळीस शहीद जवानांच्या नावावर मते मागणाऱ्या तसेच देशभक्तीचा ढोंग करणाऱ्या भाजप सरकारला संपूर्ण देशाच्या सत्ताकारणातून दूर ठेवण्यासाठी कर्नाटक राज्यातील राष्ट्रभक्त मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निपाणी मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पांडुरंग पाटील तसेच इतर मतदार संघातील सर्व काँग्रेस उमेदवारांना अधिकाधिक मताधिक्याने विजय करण्यासाठी आपला आशीर्वाद रुपी मत देऊन देशाची स्वातंत्र्य लढाई ठरणाऱ्या निवडणुकीत विजयश्री मिळवून देऊन देशोधडीला लागलेल्या देशाला पुन्हा एकदा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर उभा करण्यासाठी सहकार्य करावे असेही ते यावेळी म्हणाले.