कुजलेल्या अवस्थेत  मृतदेह आढळल्याने सिंदेवाहित खळबळ

1158

सिंदेवाही: येथील राधीका वस्त्र भंडारच्या वरच्या रिकामी खोलीत इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.ही घटना शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आली. विशषे म्हणजे  काही मुले टीव्हीची केबल दुरुस्ती करण्यसाठी राधीका वस्त्र भंडार कपड्याच्या वरच्या खोलीमधुन मुलांना दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्या मुलांनी तिथे असलेल्या रिकामी खोलीत जाऊन पाहिले असता त्यांना इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. सदर घटनेची माहिती तत्काळ चिमूर पोलीसांना देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक तुषार चव्हान यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला. कुजलेल्या अवस्थेत असलेल्या इसमाचा प्रेत उत्तरीय तपासणीकरीता सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच नागरिकांची मोठी गर्दी झाली.घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.