जंगलात फुले वेचण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू….

1143

चंद्रपूर: येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लोहारा जंगलात फुले वेचण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर दबा धरून असलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करुन ठार केले.ही घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव पुरुषोत्तम बोपचे (वय ४०) असे आहे. मृतक इंदिरा नगर येथील रहिवासी असून तो एम.ई.एल पोलाद कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.मृतक पुरुषोत्तम हा सकाळीच फुले वेचण्याकरीता लोहारा या जंगलात गेला होता. दुपार झाली तरी तो घरी परतला नाही. यामुळे मृतक पुरुषोत्तम बोपचे यांची पत्नी चिंतेत पडली. पुरुषोत्तम जंगलातून परत न आल्याची घटना तीने घरशेजारी असलेल्या पतीच्या मित्राला कळवले.त्यांनी जंगलात शोध घेतला असता मृतक पुरुषोत्तम बोपचे यांचा मृतदेह आढळला.