Home चंद्रपूर समाजमन जपणारा अवलिया-राहुल देवतळे

समाजमन जपणारा अवलिया-राहुल देवतळे

292

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक)
चंद्रपूर- स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील समाजसेवक राहुल देवतळे हे कोणत्या ना कोणत्या कार्यामुळे नेहमी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असते. त्यांनी आजपर्यंत अनेक असे जनहितार्थ कार्य केले आहे. त्यातच अजुन एक कार्य म्हणजे विठ्ठल मंदिर वॉर्डातील गोरगरीब व गरजू लोकांच्या मुलीच्या लग्नाकरिता अन्न धान्य वितरण करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे ते लोकप्रिय होत आहे. त्याच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, समाजामध्ये देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्यांचे हात भरपूर असतात परंतु देणारे हात खुप कमी असतात. समाजातील गोर गरीब जनतेकडे बघितल्यावर त्यांच्या मनात प्रश्न पडला होता. समाजाचे आपल्यावर पण थोडे का होईना ऋण आहे आणि त्यांच्या मनात ही कल्पना आली. राहुल देवतळे यांनी करत असलेल्या या समाजकार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Don`t copy text!