चैत्र शुद्ध पोर्णिमेच्या मुहुर्तावर हनुमान जयंतीचे औचित्य साधुन हनुमान मंदीर देवस्थान मंदिराचा उद्घाटन सोहळा व मुर्ती प्रतीस्ठापना कार्यक्रम विहीरगांव येथे पार पडला. यावेळी विश्वव्यापी संकटमोचनाची कीर्ती अथांग असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते हनुमान जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बोलत होते.
लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिर देवस्थान च्या वास्तुचे उद्घाटन माजीमंत्री आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले,यावेळी अध्यक्ष म्हणुन माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार, सावली तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष नितीन गोहणे,तालुका महीला अध्यक्ष उषाताई भोयर, माजी तालुकाध्यक्ष राजेश भाऊ शिध्दम,माजी उपसभापती मनोहर ठाकरे,,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निखिल सुरुवात,सरपंच सुमित उंदीर वाडे. पत्रकार दिलीप फुलबांधे, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ मोटघरे, ऍड.विलास पा.भृगुवार.सेवानिवृत्त मुख्याध्यापक दयाराम भंडारे. अनिल पा. भृगुवार,अविनाश पाटील बटृवार,मधुकर कोकाटे,उपसरपंच भारती काळबांडे. वंदनाताई फुलबांधे.देवनंदाताई वाकडे, तंमुस अध्यक्ष रमेश काळबांधे. माजी उपसरपंच तिलक वाढणकर, देवस्थान कमेटीचे अध्यक्ष पद्माकर इंगोले.कुसमाकर वाकडे, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद भंडारे, प्रास्ताविक प्राचार्य शरद धारणे, आभारप्रदर्शन कुसमाकर वाकडे यांनी केले.
देव हा दगडात नसुन माणसाच्या सेवेत आहे याची जाणीव ठेवुन राजकारण न करता लोक सेवेचा व्रत स्विकारला,विभानसभा क्षेत्रातील जनतेच्या आरोग्याची सोय म्हणून कॅंसर डीटेक्टीव ची गाडी उभी केली,विहीरगांव येथील विकास कामासाठी भर भरुन निधी उपलब्ध करुन दिल्याचा आढावा सादर केला.






