श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक चंद्रपूर)
चंद्रपूर – स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील हनुमान मंदीरात अनेक वर्षांची परंपरा राखीत हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दिवसभर भजन कीर्तन मंडळातर्फे आयोजित करण्यात आले.
सायंकाळी महिला व पुरुष भाविक यांच्या उपस्थितीमध्ये भक्तिभावाने हनुमानजीची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. तसेच मंडळाच्या माध्यमातून महाभोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या भक्तीभावाच्या कार्यक्रमाची यशस्वी भूमिका निभावणारे मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, उपाध्यक्ष अशोक नवघडे, कोषाध्यक्ष विनोद कार्लेकर, सचिव नागेश देशमुख, सदस्य विलास सातपुते, संजय बनकर, बंडु जवादे, ,संकेत म्हशाखेत्री, तुळशीराम आंबटकर तथा वॉर्डातील महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.