Home चंद्रपूर जिवती भरती प्रक्रिया संदर्भात टेकामांडवा पोलीस स्टेशनचे मुलांना प्रवृत्तपर मार्गदर्शन..

भरती प्रक्रिया संदर्भात टेकामांडवा पोलीस स्टेशनचे मुलांना प्रवृत्तपर मार्गदर्शन..

800

बळीराम काळे,जिवती

जिवती : (ता.प्र.) तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील जिवती अंतर्गत माराईपाटण येथील १२ वी शिकत व शिकून घरी आसणाऱ्या मुला व मुलींना टेकामांडावा पोलीस स्टेशन चे (पी.एस.आय.) म्हैसकर साहेब यांनी नुकतीच पोलीस भरती व इतर सर्व पदासाठी भरती पुर्ण महाराष्ट्रात निघाली असून, त्यानिमित्ताने दिनांक रविवारला ठीक ९:०० वाजता ग्राम पंचायत माराईपाटण कार्यालय येथे आोजित १२ वी पर्यंत शिकत असणारे व १२ वी पास च्या मुलां व मुलींना पोलीस भरती प्रक्रिया संदर्भात कोणत्या पद्धतीने पोलीस भरतीची तयारी कोणत्या पद्धतीने करावी लागत असते. व त्यांना प्रत्येकास पोलीस भरतीची माहिती अवगत व्हावी म्हणून,पोलीस भरती प्रक्रिया संदर्भात पूर्व तयारी म्हणून म्हैसकर साहेब पोलीस स्टेशन टेकामांडवा यांनी १०० मीटर व मुलींसाठी ८०० मीटर, अंतर किती वेळात पार करावा,आणि मुलांनी १६०० मीटर अंतर पार कशा पद्धतीने करायच्या तसेच गोळा फेक,फुल्फस,लांब जंप तसेच पेपरची पूर्व तयारी कशी करावी. ईत्यादी ह्या सर्व पोलीस भरती प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन पोलीस स्टेशन टेकामांडवा ठाणेदार मैशेकर साहेब फार मोलाचे मार्गदर्शन करताना त्यांनी ज्यावेळी स्वतः भरती प्रक्रिया करीत अस्तानी त्यांनी त्यांच्या जिवनातला अनुभव पण पोलीस भरती करणाऱ्या मुला आणि मुलींना सांगितला.
त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रिया संदर्भात उपस्थित पोलीस ठाणेदार म्हैसकर साहेब,ग्राम पंचायत चे सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील, व मुले,मुली यांची उपस्थित होती.

Don`t copy text!