Home अहेरी टायगर ग्रुप आलापल्ली प्रमुख साई तुलसीगारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित...

टायगर ग्रुप आलापल्ली प्रमुख साई तुलसीगारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित ll

629

अहेरी :- १८ ऑक्टोबर टायगर ग्रुप आलापल्लीच्या निस्वार्थ सामाजिक कार्याने प्रेरित होऊन बोटलाचेरू , वेलगुर , नवेगाव , किष्टापुर या गावात टायगर ग्रुपची स्थापना करून टायगर ग्रुप आलापल्ली अध्यक्ष दौलत रामटेके यांचे हस्ते फलकाचे उद्घाटन करण्यात आले .

रक्तदान अभावी कोणाचा जीव जाऊ नये या तळमळीने ग्रामीण अतिदुर्गम भागातील लोकांना टायगर ग्रुपच्या माध्यमातून ५००० हून अधिक रक्तदाते उपलब्ध करून दिले आहेत तसेच साई तुलसीगारी यांनी स्वतः आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून युवांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले .

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात जुगल सर बोमनवार हे चाणक्य अकॅडमी च्या माध्यमातून युवा मुलांना पोलीस प्रशिक्षण व अभ्यासिका उपलब्ध करून दिले जुगल सरांचा टायगर ग्रुप तर्फे सत्कार करून साई तुलसीगारी यांच्या वाढदिवसानिमित्त चाणक्य अकॅडमी ला १० पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आले यावेळी चाणक्य अकॅडमी चे सर्व विध्यार्थी जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा आभार मानले .

अत्यावश्यक वेळी जनसामान्य लोकांच्या सुख दुःखात मदत करतात म्हणून ग्रामस्थांनी टायगर ग्रुप आलापल्ली प्रमुख साई तुलसीगारी यांचा वाढदिवस उत्सवात बजरंग चौक आलापल्ली येथे साजरा करण्यात आला.

Don`t copy text!