Home चंद्रपूर राज्य सरकारच्या निर्णयाचे शिव ब्रिगेड संघटनेतर्फे स्वागत….राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांसाठी...

राज्य सरकारच्या निर्णयाचे शिव ब्रिगेड संघटनेतर्फे स्वागत….राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय…

404

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर -मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने कळविल्याप्रमाणे मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी वस्तीगृह ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती व पोलीस भरती बाबत घेतलेल्या निर्णयाचे शिव ब्रिगेड संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी 72 वस्तीगृह सुरू करणार तथा इतर मागासवर्गीय विजाभज व विमाप्र गुणवंत मुला-मुलींना प्रदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता 50 विद्यार्थ्यांना मिळणार व पोलीस भरती संवर्गाचे 2021 मध्ये सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामुळे सूट देऊन एकूण 20000 पदे गृह विभागातील भरणार आदी निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले.

शिव ब्रिगेड संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष सतीश मालेकर इंजिनीयर विक्रांत टोंगे प्रदेश सचिव मयूर पा ऊनकर जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर प्रलय मशाखेत्री जिल्हा सचिव यांच्या नेतृत्वात मागील अनेक वर्षापासून ओबीसी विद्यार्थी करता वस्तीगृह परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पोलीस भरती याकरता विविध आंदोलने केली व राज्य सरकारकडे मागणीचा रेटा लावून धरला होता.

अनेकदा निवड आश्वासना व्यतिरिक्त ओबीसींना काही प्राप्त झाले नाही मात्र आता राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतल्याने ओबीसी विद्यार्थ्या तर्फे आनंद झाला आहे व शिव ब्रिगेड संघटना या निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानत आहेत.

याप्रसंगी बाबा भसारकर, सुरज दहागावकर, विशाल शेंडे, संतोष देरकर, नोमेश मडावी, कालिदासजी वालके, प्रभूदास
वासाडे, महेश बावणे, प्रकाश चालूरकर, प्रफुल्ल बेले, बबन जी मुळे, कौशिक माथनकर, विशाल शेंडे, मिलिंद गिरडकर, सचिन पिदुरकर, संतोष देरकर आदी उपस्थित होते

Don`t copy text!