रस्त्यावरच रोवणी करायची का? लाठी वासीयांचा स्थानिक प्रशासनाला प्रश्न…

724

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपुर:  हा रस्ता आहे ‘स्वच्छ लाठी सुंदर लाठी’ चा फलक गावाच्या पुढे लागणाऱ्या लाठी(गोंडपीपरी) या गावाचा. . .
ऐन बसस्थानकाला लागून गावाच्या आत जाणाऱ्या या रस्त्याची दुर्दशा इतकी भयंकर आहे की मोटारसायकल तर सोडा पण पायदळ माणसाला सुद्धा प्रश्न पडत आहे की गावाच्या बस स्थानकावर नेमकं जायचं कसं ?

धान रोवताना ज्या पध्दतीने आधीच चिखल करावं लागतं अगदी त्याच पध्दतीने गावाची अवस्था झाली आहे. आता नागरिकांच्या मनामध्ये संतप्त सवाल आहे की ईथे धान रोवायचे की काय? कारण अगदी मोटारसायकलने जाणार्या मानसापासून ते पायी चालणाऱ्या माणसांपर्यंत अनेक लोक घसरून पडल्याचे इथे कित्येक उदाहरण आहे .

अशा परिस्थितीत नागरिकांनी जाणं येणं बंद करायचं का? शाळेतल्या मुलांनी शाळेतच जाऊ नये का ?हा सवाल ग्रामस्थांच्या मनामध्ये येत आहे .

याआधीही या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्यानं दुर्लक्ष केलं आहेत. आता तरि हा रस्त्याचं बांधकाम पूर्ण होईल आणि एक चांगला रस्ता लाठी ग्रामवासियांनी मिळेल एवढी ग्रामस्थांची आशा आहे. अन्यथा हा मार्ग कायमसाठी बंद आहे असा फलक त्याठिकाणी लावायची बीड लाठी ग्रामस्थांवर येऊ नये एवढीच अपेक्षा प्रशासन आणि शासनाकडून असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे ….