Homeगोंडपीपरीमा.सा.कन्नमवार मॉडेल ग्राम पथक अधिकाऱ्यांनी केले हिवरा ग्रामपंचायतचे परीक्षण

मा.सा.कन्नमवार मॉडेल ग्राम पथक अधिकाऱ्यांनी केले हिवरा ग्रामपंचायतचे परीक्षण

 

गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हिवरा ग्रामपंचायतीत मा.सा. कन्नमवार मॉडेल ग्राम पथक अधिकाऱ्यांनी विविध कामकाजाचे परीक्षण केले.

मा.सा.कन्नमवार मॉडेल ग्राम सन २०२२-२३ ही योजना गोंडपिपरी पंचायत समितीत अंतर्गत येत असलेल्या निवडक ग्रामपंचायत पैकी योजनेत हिवरा ग्रामपंचायतचा सहभाग आहे. स्मार्ट ग्राम पथक अधिकाऱ्यांनी हिवरा ग्रामपंचायतचे परीक्षण करीत असताना गावातील सार्वजनिक संडास, वैयक्तिक संडास, नळ जोडणी, रोजगार हमी अंतर्गत जॉब कार्ड, स्मशानभूमी, वृक्ष लागवड, शालेय विभाग, आरोग्य विभाग, अंगणवाडी विभाग, व्यायाम शाळा, यासह अनेक विकास कामांचे व्यवस्थापन याची चौकशी करून परीक्षण केले. परीक्षण मुख्याधिकारी मरस्कोल्हे मॅडम यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

परीक्षणात दरम्यान स्मार्ट ग्राम पथकाच्या परीक्षण मुख्याधिकारी मरसकोल्हे मॅडम, देवतळे साहेब, विस्तार अधिकारी सावसाकडे साहेब, शिंदे साहेब,सरपंच निलेश पुलगमकर , उपसरपंच वर्षा कुत्तरमारे, ग्रा.प.सदस्य जितेंद्र गोहणे, सदस्या अरुणा नेवारे, जि.प. शाळेचे शिक्षक ताटेवार सर, अंगणवाडी सेविका प्रिती मुंजनकर, अंगणवाडी सेविका प्रिया नेवारे, प्रा.आ.उपकेंद्राच्या टी.एच.ओ.अश्विनी चंद्रागडे, बचत गट सी.आर.पी. अर्चना म्हशाखेत्री, ग्रामसेवक संतोष घाटे, रोजगार सेवक भिवसन चहारे, ग्रा.पं. ऑपरेटर उमेश पुलगमकर, दिलीप पुलगमकर, रवींद्र बोरकुटे,पथक अधिकारी व हिवरा ग्रामस्थ उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!