गोंडपीपरी: आष्टी जवळील वैनगंगा नदीला पुर आल्याने आष्टी-गोंडपीपरी मार्ग बंद पडला आहे. या मार्गाची वाहतूक सकाळपासून बंद पडली. गोंडपीपरी तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार सुरू हजेरी लावली. नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले.
दरम्यान गोषीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने आष्टी जवळील वैनगंगा नदीला पुर आला. परिणामी आष्टी-गोंडपीपरी मार्ग बंद पडला आहे.
या अगोदर सुद्धा चार वेळा वैनगंगा नदीला पूर आल्याने आगस्ट महिन्यात या मार्गाची वाहतूक बंद पडली.