पाणी पिण्यास गेलेल्या माणसाचा तोल जाऊन नदीपात्रात बूडून मृत्यू.. त्यांचा कूटूबीयांना माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार कडून आर्थिक मदत

948

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)

गोंडपिपरी :- तालुक्यातील मौजा चेकबापूर सकमूर येथील रहिवासी जानकीराम मल्लया जक्कूलवार शेळी चरायला नदीकाठच्या झुडपात गेला असता दरम्यान तहान भागवण्यासाठी नदीकाठी गेला, पाणी पित असतांना तोल जाऊन पाय घसरला व नदीपात्रात बूडून मृत्यू झाला.त्या कुटूंबातील कमावता व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांची पत्नी व मुलगा यांचावर दुःखाचा डोंगर कोसळला.

जानकीरामच्या कुटुंबावर आलेली आपत्तीची माहीती कार्यकर्त्यांकडून मिळताच माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी आधार बनून संकटकाळात त्यांचा घरी जाऊन कूटूंबीयांची सांत्वन केली व आर्थिक मदत केले व शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले.वेळेवर मदत केल्याबद्दल जक्कूलवार कुटूंबातील सदस्यांनी अमरभाऊंचे आभार मानले.
त्यावेळेस सकमूर ग्राम पंचायत सदस्य संतोष मूगलवार, जीवन अलोने,संजय तेलजीरवार ,आनंदराव जक्कूलवार, संतोष तोटेडवार, शंकर सोनटक्के, विनोद जक्कूलवार हिवराचे सरपंच निलेश पूलगमकर व गावकरी उपस्थित होते.