करंजी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे दिलीप वासेकर

782

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: माजी बहूजन विकास, ओबीसी कल्याण कॅबिनेट मंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या जन्मगाव असलेल्या तालुक्यातील करंजी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप वासेकर यांची निवड करण्यात आली आहे. विरोधकांना चित करून पाचव्यांदा करंजी गाववासीयांनी वासेकर यांच्यावर विश्वास दाखविला आहे हे विशेष…

काँग्रेसचे काँग्रेस जिल्हा सचिव कमलेश निमगडे यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले दिलीपभाऊ वासेकर यांची मोठया मत्ताधिक्याने ग्रामसभेत जोगापुर व करंजीकरानी निवड केली. याबद्दल नवनियुक्त अध्यक्ष दिलीप वासेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

यावेळी सरपंच सरिता पेटकर, उपसरपंच, जयश्री तेलकापल्लीवार,छत्तरसिंग डानगी,समीर निमगडे, सतपाल डानगी, मधुकर तेलकापल्लिवार , चरणदास मांदाडे, वासुदेव मांदाडे, दिलिप चापले, मनोज मोहूर्ले, मारोती जुवारे , अनिल आत्राम, झाराबई चांदेकर, सुरेखा श्रीकोंडावार , निखिल बामने, प्रमोद पेंदोर, सुरेश श्रीवास्कर , विमल कतलाम , हिरामण निमगडे उपस्थित होते…