तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

588

दिनेश मंडपे
जिल्हा संपादक

नागपूर: तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य आयोजीत  कार्यक्रमाचे युगांतर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत. कलश तिरपुडेयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन  श्री. गणेश एम. गौरखेडेसरचिटणीसयुगांतर शिक्षण संस्था यांनी केले. प्रसंगी युगांतर शिक्षण संस्थेचे विविध पदाधिकारी तसेच प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारीतिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, नागपूर हे आवर्जून उपस्थित होते. श्री. गणेश एम. गौरखेडेसरचिटणीस, युगांतर शिक्षण संस्था यांनी नव युगाची नव दिशाभारत एक युवा शक्तीउतुंग भरारी घेणारे राष्ट्र असून युवकांनी योग्य दिशेने कार्य करणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर राष्ट्रध्वजातील प्रत्येक रंग काय प्रतीत करतो याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित  केले.  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे  वाचन केले. प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकशिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संस्थेअंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. संबधित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा. से. यो. चे कार्यक्रम अधिकारी डॉ. हिरालाल मेश्राम,  प्रा.संध्या फटींगतसेच दिनेश मंडपे,  सिध्दार्थ गजबेविजय वरठी व महाविद्यालयातील समस्त विद्यार्थ्यांनी  विशेष सहकार्य केले.