बळीराम काळे,जिवती
जिवती : अर्जुनरावजी गोतावळे यांचे सहा वर्षापूर्वी ०५ ऑगस्ट,२०१६ ला निधन झाले. वडिलांची शिक्षणाबद्दलची आस्था आणि शिक्षणानेच माणसाचे जीवन बदलते यावर त्यांचा प्रगाढ विश्वास होता. म्हणूनच वडिलांच्या निधनानंतर दरवर्षी कुठलेही धार्मिक विधी न करता त्याऐवजी शाळेमधील विध्यार्थ्यांना आवश्यक असे शैक्षणिक साहित्य वाटप करून आपल्या वडिलांना आदरांजली वाहण्याचा निर्णय गोतावळे परिवारानी सहा वर्षापासून जोपासला आहे.
यावर्षी सुद्धा आज दिनांक ०५ ऑगस्ट, २०२२ ला वडिलांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्ताने कै. अण्णाभाऊ साठे विद्यालय, कुंभेझरी येथील इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी च्या विध्यार्थ्यांना गोतावळे परिवाराच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करून स्वर्गीय अर्जुनराव गोतावळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी प्राचार्य एन. एल. पाचभाई, प्रा. जे. एच. गांजरे, व्ही. एन. लोंढे, पेंदोर सर , वाघमारे सर, मालेकर सर , दिलीप जिवने, बुचे मॅडम, नांदुरकर मॅडम, बोरीकर सर, डवरे, बोन्डे, तसेच गोतावळे कुटुंबातील सदस्य डॉ.अंकुश गोतावळे, अंबादास गोतावळे, लहुजी गोतावळे, रामू गोतावळे, रणजित सूर्यवंशी, ज्ञानोबा आक्रपे, तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी आदरांजली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.