गोंडपिपरी येथील १५ कोटीच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न.. खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे यांची उपस्थिती.

540

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: १५ कोटी मंजूर निधी अंतर्गत गोंडपिपरी येथे प्रशासकीय भवन इमारत बांधकामाचे भूमिपूजन लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती सभागृह येथे समारंभाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार बाळुभाऊ धानोरकर म्हणाले की, लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान असून ते प्रचंड परिश्रम घेऊन विकासकामे पूर्ण करीत आहेत. आम्ही देखील आवश्यक तेथे त्यांना सहकार्य करीत असून नेहमी त्यांच्या सोबत राहू. जनतेने देखील विकासासाठी झटणाऱ्या नेत्यांना भक्कम साथ दिली पाहिजे. तर आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमी पाठपुरावा करीत राहणार असून येथे सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता कुळमेथे, उपनगराध्यक्षा सारिका मडावी, कार्यकारी अभियंता श्री. भास्करवार, तहसीलदार श्री. के डी मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी वैद्य, कृ उ बा समितीचे सभापती सुरेश चौधरी, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा रेखा रामटेके, सं गां नि योजनेचे अध्यक्ष विनोद नागापुरे, शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे, उपसभापती अशोक रेचनकर, संभुजी येल्लेकर, गौतम झाडे, संतोष बंडावार, अनिल झाडे, राकेश पून, सचिन चिंतावार, सुरेश चिलनकर, वनिता वाघाडे, वनिता देवगडे, शारदा गरपल्लीवार, रंजना रामगीरकर, श्रीनु कंदनुरवार, बालाजी चनकापुरे, तुकेशभाऊ वानोडे, अनिल कोरडे, नितेश मेश्राम, यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सचिन फुलझेले यांनी केले.

 

.