प्रितम म. गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)
आल्लापल्ली :- गडचिरोली जिल्ह्यात संतप्त पाऊसामुळे जिल्हाभर पुरस्थिती निर्माण झाली असून अहेरी तालुक्यामध्ये आल्लापल्ली, नागेपल्ली, मोदुमडगू, सावरकर चौक हे ठिकाण संपूर्ण महापुराने वेढलेले आहे. काल दिनांक ११ जुलै २०२२ चा रात्री हवामान खात्याने मुसळधार पाऊसाचा अंदाज दर्शवला होता पण नागरिकाने हवामान खात्याचा गोष्टीकडे लक्ष न देता निवांत झोपी गेले. परंतु रात्री धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढत गेली. पाण्याची पातळी वाढत असताना हे पाणी लोकांच्या घरापर्यंत येऊन ४ – ४ फूट पर्यंत पाणी पोहचले. ज्यावेळी लोकांना जाग आली तेव्हा त्यांचा आजूबाजूने पूर्णपणे पाणी दिसुन आले.
या परिस्थिती मध्ये त्या लोकांनी स्वतःला वाचवण्याची प्रयत्न केले परंतु त्यांना कुठे तरी मदत मिळाली नाही. ही बाब स्वराज्य फाउंडेशन आल्लापल्ली व आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ च्या कार्यकर्त्यांना माहिती झाली. तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अर्ध्या रात्री ३:०० वाजेपासून सकाळी पर्यंत पुरामध्ये अडकून असलेल्या लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवले.
मोदुमडगू येथील पूरग्रस्तांना दोरीच्या मदतीने मदत केली. त्यानंतर त्यांचे सामान ही सुरक्षित ठिकाणी पोहचविले. सोबतच तेवढयात ही न थांबता नागेपल्ली,सावरकर चौक,बजरंग चौक,येनकापल्ली,मोदूमडगू जुना आणि नवीन असे अनेक ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आणि जे प्रवासी पुरामुळे अडकून होते त्यांच्यासाठी सुध्दा जेवणाची व्यवस्था करून त्यांना जिथे जायचे होते तिथे त्यांना पोहचविण्यात इथल्या कार्यकर्त्यानी मदत केली. जोपर्यत महापूर स्थिती राहील तो पर्यंत स्वराज्य फाउंडेशन आल्लापल्ली व आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ यांच्या कडून मदत पुरविले जाईल असे आश्वासन कार्यकर्त्यानी दिले.






