आदिवासी सोसायटीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीचा झेंडा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चा सुफडा साफ

874

बळीराम काळे/जिवती

जिवती: आदिवासी विविध सहकारी कार्यकारी संस्था, जिवती येथील झलेल्या निवडणुकीत गोंडवाना प्रनित पॅनलच्या १३ पैकी १३ उमेदवारानी दणदणीत विजय प्राप्त करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चा सुफडा साफ करून जिवती येथील आदिवासी विविध सहकारी कार्यकारी संस्थावर गोंडवाना गणतंत्र पार्टीचा झेंडा फडकवून गोंगपा च्या पॅनल ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सदर निवडणुक पांडुरंगजी जाधव,गोंगपा चे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक, गजानन पाटील जुमनाके,गोंगपा युवामोर्चा कार्याध्यक्ष तसेच महेश देवकते,माजी उपसभापती यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस चा सुफडा साफ झाला. सुभाष धोटे, आमदार यांच्या विधानसभा क्षेत्रातील जिवती येथील आदिवासी विविध सहकारी मर्यादीत संस्थावर एकाही उमेदवाराला आपले खाते उघडता आले नाही.
विजयी उमेदवारांमध्ये सतलुबाई गोदरू पाटील जुमनाके, नामदेव जुमनाके, शकुंतला कुमरे, गोदाबाई जुमनाके, चिंनु आडे, कर्णू कोडापे, जंगु कोटनाके, गणेश राठोड असे ८ उमेदवार गोंडवाना गणतंत्र पार्टी तर बळीराम संबटवाड, दुदम वजगिर,विठ्ठल नेदेवड, विठल केजगीर, ईश्वर मुस्थापुरे असे ५ भाजप असे १३ पैकी १३ गोंडवाना प्रनित पॅनलच्या उमेदवारानी विजय खेचून आणून सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापीत केले.
विजयी झलेल्या उमेदवारांना जिल्हा पांडुरंगजी जाधव, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक, बापूरावजी मडावी, जिल्हाध्यक्ष,गोंगपा,महेबूब शेख, प्रदेश प्रवक्ते,गोंगपा, इस्माईल शेख,शेतकरी संघटना, केशवराव गिरमजी,अध्यक्ष,भाजपा, जिवती, भीमराव जुमनाके, सामाजिक कार्यकर्ता, ममताजी जाधव, नगर सेवक, भीमराव मेश्राम,माजी सभापती, मंगुजी मडावी,मारू पा.नैताम, जमाल्लूद्दीन शेख,नगरसेवक, क्रिष्णा सिडाम,नगरसेवक, लक्ष्मीबाई जुमनाके,नगरसेविका यांनी विजयी उमेदवारांना भेटून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.