Home Breaking News तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयातर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम…

तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयातर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम…

293

सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, नागपूर द्वारा घोषित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ सामाजिक समता सप्ताह निमित्त तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने नागपुरातील पिटेसूर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले तसेच त्यांच्यासोबत मिळून परिसराची स्वच्छता करण्यात आली.

या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर दीपक मसराम व नरेश धुर्वे सर हे होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्या2र्थी सिद्धांत ढोणे, रोहिणी पवार, उज्वलकुमार कडू, खसरंती रेअंग, प्राची डोंगरे आणि काही ग्रामस्थ अनिताबाई उईके, आरती कटोते, ज्योती किडणाके, मानसी कटोते, किरण धूर्वे, लीलाबाई कटोते, व अन्नू उईके यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

Don`t copy text!