Home Breaking News सिंदेवाही तालुक्यातील लाटबोरी गावात कोसळली रिंग

सिंदेवाही तालुक्यातील लाटबोरी गावात कोसळली रिंग

623

सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील लाटबोरी गावातील नागरीक रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान आप आपल्या घरामध्ये जेवण करीत असतांना घराच्या वरती कशाचा तरी आवाज येतो म्हणून पाहण्यासाठी घराबाहेर निघाले असता बांब फुटल्या सारखा आवाज ऐकू आला आणि अवघ्या काही क्षणात आकाशा मधुन गोल आकाराची रिंग कोसळली पहायला मिळाली.

काही वेळ भितीचे वातावरण पसरले होते. मात्र क्षणार्धात लोकांची उत्सुकता ती रिंग पाहण्यासाठी वाढली संपूर्ण गावकऱ्यांनी घटना स्थळी एकच गर्दी केली. अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात येऊ लागल्या जमलेले लोक आप आपल्या पध्दतीने निष्कर्ष काढु लागले कोणी म्हणे ऊल्का आहेत कोणी म्हणे सॅटेलाईट आहे. मात्र विषेश म्हणजे आता पर्यंतची चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाटबोरी गावातील हि लोकांनी पाहिलेली पहिलीच घटना आहे.

मात्र आता पर्यंत नेमका हा काय प्रकार आहे हे कळु सकले नाही. लोकानं मध्ये शंका कुशंका ना पेव फुटले आहेत. लवकरच पडलेली रींग कशाची आहे. याचा शोध घेने सुरू आहे.

Don`t copy text!