Home Breaking News पक्ष संघटन व वाढीसाठी स्वताला झोकून कार्य करा – ना.विजय वड्डेट्टीवार.. ...

पक्ष संघटन व वाढीसाठी स्वताला झोकून कार्य करा – ना.विजय वड्डेट्टीवार.. पोंभूर्ण्यात कांग्रेस कार्यकर्ता बैठक संपन्न..

496

पोंभूर्णा :- तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ मार्चला आगामी येणाऱ्या जि.प. व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे नियोजन व कांग्रेस कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष कवडू कुंदावार, यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने इतर मागास बहुजन कल्याण विभाग,आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या वनविश्रामगृहात कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वडेट्टीवार यांनी पक्ष व संघटन वाढीसाठी स्वताला झोकून निस्वार्थपणे कार्य करा. राजकारणात स्थितांतरे होत राहतात मात्र आपण लोकांची कामं करत राहा मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल अशी ग्वाही देत मार्गदर्शन केले. यावेळी गावखेड्यातून समस्या घेऊन आलेल्या लोकांची समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आदेश देण्यात आले.

पोंभूर्णा तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून देण्यात यावे असे दिलेल्या निवेदनाची वेळीच दखल घेत ग्रामपंचायतीत निधी कमी पडू न देण्याचे आश्वासन देण्यात आले. तालूक्यातील गावाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी भरीव नाधीची तरतूद करून दिली. तालुका काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष कवडू कुंदावार यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावा यासाठी करण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या मागणीला वडेट्टीवार यांनी अंधारी नदीवर कोल्हापूरी बंधाऱ्यासाठी विशेष तरतूद करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Don`t copy text!