Homeचंद्रपूरसमाज आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे - आ. किशोर...

समाज आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला सक्षमीकरणाची गरज आहे – आ. किशोर जोरगेवार.. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप..

चंद्रपूर : यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात असून या माध्यमातून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने केल्या जात आहे. हे सर्व उपक्रम सुरु असतांना समाज आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी महिला सक्षमीकरणाचीही गरज असून स्वयंरोजगारातून त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूने हा शिलाई मशिन वाटप उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

यंग चांदा ब्रिगेड तथा स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात शिलाई मशिन वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, शासकिय अभियांत्रिकी महविद्यालयाचे प्राचार्य सुधीर आकोजवार, डाॅ. बंडू रामटेके, यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर प्रमुख कौसर खान आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेड ही संघटना कार्यकर्त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमातून प्रत्येक घरात पोहचली आहे. शेवटच्या गरजू पर्यंत पोहचून त्यांना मदत करण्याचा या संघटनेचा हेतू आहे. त्यात संघटनेला यशही मिळत आहे. महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही संघटना उत्तम काम करत आहे. महिलांसाठी अनेक उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविल्या जात असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आजवर स्त्रिया पुरुषांवर अवलंबून होत्या, नंतर मात्र स्त्रियांनी स्वतः साठी आवाज उठविला तेव्हा त्याला महिला सक्षमीकरण असे नाव देण्यात आले. महिलांना जागरूक करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अनेक जागरुकता कार्यक्रम चालवले जात आहेत सोबतच महिलांची आर्थिक प्रगती व्हावी या करिता शिवनकाम करणा-र्या अत्यंत गरजू महिलांना शिवणयंत्र देण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्याची सुरवात आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अनेक महिलांना उत्तम शिवणकाम करता येते मात्र आर्थिक परिस्थितीमूळे त्यांच्याकडे शिवणयंत्र नसल्याने या क्षेत्राकडे त्या पाठ फिरवत आहे. अशा गरजू महिलांना शिवणयंत्र देण्याच काम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केल्या जात आहे. यातून गरीब गरजू महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार असून हा उपक्रम निरंतर राबवण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात 50 शिलाई मशिनचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, बहुजन आघाडी प्रमुख, विमल काटकर, बंगाली समाज महिला प्रमूख सविता दंडारे, कल्पना शिंदे, आशा देशमूख, स्मिता वैद्य, वैशाली वैशाली मेश्राम, वैशाली रामटेके, नंदा पंधरे, अस्मिता डोणारकर, संताषी चैव्हाण, आरजू सय्यद, वैशाली मद्दीवार, माधुरी निवलकर, अलका मेश्राम, अनिता झाडे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सुपरट्रांग वुमन वर्षा रामटेके आणि रोबोवार स्पर्धेत चमकलेल्या विद्यार्थांचा सत्कार

यंग चांदा ब्रिगेडच्या शिवणयंत्र वाटप कार्यक्रमात पॉवर लिफ्टींग स्पर्धेत विजयी झालेल्या सुपरट्रांग वुमन वर्षा रामटेके आणि गुजरातच्या रोबोवार स्पर्धेत चमकलेले चंद्रपूरचे विद्यार्थी अक्षय खनके, सोहम बुटले, सोनू सिंग, वैष्णवी बुटले, सिध्दी तेलंग, टीकमचंद आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!