गोंडपिपरी :- दिनांक 13 /मार्च/2022 रोज रविवारला परिवार विकास फाउंडेशन व मानवटकर मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने* श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान श्रीक्षेत्र धाबा ता गोंडपीपरी येथे आयोजित रोगनिदान शिबिराचे उदघाटन डॉ. माधुरी मानवटकर,सौ. वैष्णवीताई अमर बोडलावार जि प सदस्या यांच्या हस्ते रविवार (दि.13/3/2022) रोजी संपन्न झाले. या शिबिरास उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी डॉ. माधुरी मानवटकर जनरल सर्जन,सौ. वैष्णवीताई बोडलावार जि प सदस्या, अरुण भाऊ कोडपे उपसभापती पं स गोंडपीपरी डॉ. उल्हास बोरकर अस्तिरोगतज्ञ, डॉ. शैलेश वांदिले बालरोगतज्ज्ञ, डॉ. प्रदीप मंडल जनरल फिजिशियन, डॉ.प्रदीप चव्हाण बालरोगतज्ज्ञ,नंदाताई घोगरे सरपंच ग्रा.पं धाबा, अमरभाऊ बोडलावार अध्यक्ष को म सं धाबा, स्वप्नील अनमूलवार कोशाध्यक्ष को म सं धाबा,हिराजी कंदिकुरवार उपसरपंच ग्रा पं धाबा, स्वीटी डोंगरे उपसरपंच किरमिरी, डॉ लोने बैद्यकीय अधिकारी धाबा,उप पोलीस स्टेशन धाबा चे ठाणेदार धोकटे साहेब आदिंची प्रमुख उपस्थिती होती.