नागपूर जिल्हा प्रतिनिधी
मध्य नागपूर शहराची कार्यकारणी आज दि :-14/01/2022 ला मध्य नागपूर विधानसभा अध्यक्ष नरेश निमजे यांच्या जनसंपर्क कार्यालयात चिटणीसपुरा महाल येथे घोषित करण्यात आली. यावेळी पार्टी केंद्रीय उपाध्यक्ष मुकेश मासुरकर व पॉलिट ब्युरो सदस्या सुनीता येरणे प्रामुख्याने उपस्थित होते.मध्य नागपूर ला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे शेकडो कार्यकर्ते राहतात प्रत्येकाचे विचार आहे कि मध्य नागपूर मधून पार्टी ने स्वबळावर मनपा निवडणुकीत उतरावे म्हणून सर्व कार्यकर्ते पार्टीला वाढविण्याच्या दृष्टिकोनातून काम करीत आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला सर्वात जास्त वाव मध्य नागपूर मधूनच मिळत राहिला आहे. यावेळेला मनपा निवडणुकीत जय विदर्भ पार्टीचा झंडा फडकलाच पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
नरेश निमजे यांनी मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राची जिम्मेदारी स्विकारण्याच्या 10 दिवसा नंतर कार्यकारणीचा विस्तार करत मोरेश्वर वनकर यांना मध्य नागपूर उपाध्यक्ष, मधुकर जुमडे यांना उपाध्यक्ष, प्रकाश पोकळे यांना कोषाध्यक्ष, श्रावण हेडाऊ यांना सहसचिव म्हणून मुकेश मासुरकर व सुनीता येरणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती करताना हिमांशू रणदिवे, राजेश बंडे, धनराजजी क्षीरसागर, नीलकंठ अंभोरे, विठ्ठल येलकर सह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.






