शरद कुकूडकार प्रतिनिधी भंगाराम तळोधी
आज दि.11/10/2021 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता हिवरा ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाली. ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.अनेक योजनांची माहिती देण्यात आली. महात्मा गांधी तंटामुक्त समिती पूनर्गठीत करण्याचा विषय सुरू झाला.त्यात शंकर येलमुले यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी बहुमताने निवड करण्यात आली.खर तर गावखेड्यात समितीचे अध्यक्ष पद हे अतिशय सन्मानाचे जाते, गावांतील वाद-विवाद तंटे हे परस्पर समजूतदारपणाने गांवातच सोडवले जावे यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आली
श्री.शंकर येलमुले तंटामुक्ती अध्यक्ष
श्री. नीलकंठ पुलगमकार सरपंच
सौ. वर्षाताई कुत्तरमारे उपसरपंच
श्री.गिरीश रामटेके पो.पा.
श्री.जितेंद्र गोहणे ग्रा.प.सदस्य तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष
श्री.प्रकाशभाऊ हिवरकर
गयाबाई डोके
श्री.देवाजी चहारे
श्री.चांगदेव चहारे
श्री.गुलाब आक्केवार
श्री.कुशाबराव पुलगमकार
यांसह तलाठी, बीट अमलदार,आरोग्यसेवक,शिक्षक,बचत गट,पत्रकार,युवक वर्ग असे विविध प्रतिष्ठित व विविध पदसिध्द पदाधिकारी
यांची एक त्रित्याऊंस निवड करून नवीन तंटामुक्ती समिती गठित करण्यात आली.
Home चंद्रपूर गोंडपिंपरी हिवरा ग्राम पंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी शंकर येलमुले यांची बहुमताने निवड…






