वंचित बहुजन आघाडी तर्फे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तहसीलदाराना निवेदन…

248

सुनील डी डोंगरे..

गोंडपिपरी : वंचित बहुजन आघाडीच्या वतिने जनतेच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री ,पंतप्रधान यांना तहसिलदारामार्फत नुकतेच निवेदन देण्यात आले.

निवेदनातून पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
1)ओबीसी ची जात निहाय जनगणना करण्यात यावी.
2)ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
3)पेट्रोल ,डिझेल, गॅस च्या किंमती कमी करण्यात याव्यात.
4)शेतकऱ्यांची कापलेली विज पूर्ववत करून द्यावी.
निवेदन सादर करताना सुरेश दुर्गे,सुरेंद्र मांदाडे, डॉ प्रकाश तोहोगावकर ,तेजराज डोंगरे ,राजेश डोडीवर, शिलवर्धन मुंजनकर ,आशिष फुलझेले ,अमरदास डोंगरे ,डॉ मोहन डोंगरे ,तुळशीदास बारसागडे ,सुरेंद्र रायपूरे,राकेश बट्टे,विलास नागपूरे ,सौरभ नागापुरे,चेतन झाडें ,संजय वाघाडे इ ची उपस्थिती होती.