रेगडी येथील कन्नमवार जलाशयातील धबधबा वाहण्यास सुरू…..वाढली पर्यटकांची गर्दी

781

ब्युरोचिफ प्रशांत शाहा

गडचिरोली:चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशयात काल रात्रो पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयातील ओव्हर फ्लो सुरू झाला आहे
या वर्षी पाऊस उशिरा पडल्याने काल 1 ऑक्टोबर रात्री पासून बरसलेल्या पावसाने जलाशयातील ओव्हर फ्लो वाहण्यास सुरू झाली आहे

या वर्षी पहिल्यांदाच धबधबा ओव्हर फ्लो होत असल्याने जिल्ह्यातील अनेक पर्यटक जलाशयाला भेट देण्यास सुरुवात केली आहे

दुसरीकडे चामोर्शी परिसरात चांगलाच पाऊस पडत आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा काल पासून जलाशयातील पाणी कालव्या द्वारे सोडण्यात आले आहे

पाणी सोडल्याने रेगडी येथील नागरिक खंत व्यक्त करत आहेत
पाऊस येत असतांना सुध्दा का बर जलाशयातील पाणी सोडले आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे