HomeBreaking Newsनाशिक मधील धक्कादायक घटना ! एका व्यावसायिक विधवा महिलेवर तोंडात बोळा कोंबुन...

नाशिक मधील धक्कादायक घटना ! एका व्यावसायिक विधवा महिलेवर तोंडात बोळा कोंबुन केला गेला बलात्कार “.

प्रतिनिधि  दिलीप सोनकांबळे

नाशिक :देशाला हादरवून सोडणारी मुंबईतील साकीनाका  येथील घटना ताजी असताना, डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी अत्याचाराचा कळस गाठला आहे. यानंतर आता नाशिक शहरात महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. येथील एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून अत्याचार केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, अवघ्या काही तासांत पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.

ही घटना नाशिक शहरातील पवननगर भागात घडली आहे. तर पीडित महिला विधवा असून तिचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित महिला आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असताना, संशयित आरोपी तिच्या दुकानात शिरला. यानंतर त्याने पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर 2 तास अत्याचार केला आहे.
या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेनं धाडस करून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नितीन पवार असं नराधमाचं नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. अलीकडेच तो एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. दरम्यान तुरुंगातून सुटल्यानंतर तो फरार झाला होता. पोलीस आरोपीच्या शोधात असतानाच त्यानं हा बलात्काराचा गंभीर गुन्हा केला आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी चार पथकं तयार करत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!