बालाजी कांबळे यांची तंटा मुक्त समिती च्या अध्यक्ष पदी निवड

309

दिपक साबने,जिवती (प्रतिनिधी)

जिवती : महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समिती, येल्लापूर च्या अध्यक्ष पदी बालाजी मनमत कांबळे यांची ग्रामसभेत बहुमताने निवड करण्यात आली.

जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत येल्लापूर येथील ग्राम सभा नुकतीच पार पाडली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात महात्मा तंटा मुक्ती गाव समिती,येल्लापूर ची अध्यक्षांची निवडणूकही पार पडली. यामध्ये सर्वानुमते येल्लापूर येथील एक सभ्य व्यक्तिमत्त्व बालाजी कांबळे ची निवड करण्यात आली.

ग्रामसभेला उपस्थित जांभुळकर सर,प्रशासक, उद्भवकुमार जोंधळे, पोलीस पाटील,येल्लापूर, कुमारी स्मिता दिवाकर वऱ्हाडे,ग्रामसेविका व १६० ग्रामस्थउपस्थित होते.
गावातील छोटे-मोठे झगडे तंटे वाद सोडविन्यासाठी व गावाला तंटामुक्त गाव बनविण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कार्य करेन असे आश्वासन नवनियुक्त तंटा मुक्त समिती अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी गावकऱ्यांना दिले.