Home Breaking News आष्टी पोलिस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ अटकेत….आष्टी पोलीस स्टेशन नेहमी वादग्रस्त?..जिल्हा...

आष्टी पोलिस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ अटकेत….आष्टी पोलीस स्टेशन नेहमी वादग्रस्त?..जिल्हा पोलीस अधिकारी योग्य कारवाई करणार का??न्यायासाठी जाणाऱ्या नागरिकास पोलीस उपनिरीक्षक यांनी केली होती मारहाण

890

चक्रधर मेश्राम (सहसंपादक)

आष्टी: लाच प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कामगिरी असुन आजपर्यंत अनेक भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगले धडे शिकवले आहे. ज्या पोलीस विभागाकडून न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना असते. परंतु संरक्षण करण्यासाठी ज्या पोलिसांकडून अपेक्षा असते. तेच भक्षक ठरतात तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. असाच प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाण्यात घडलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलिस ठाण्याचे दोन कर्मचाऱ्यांनी, देशबंधूग्राम या गावातील एका व्यक्ती कडून, एका तक्रारी विरूध्द गुन्ह्यामध्ये गाडी जप्त न करण्यासाठी आणि केलेल्या गुन्ह्यात बेकायदेशीर मदत करण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली होती.नंतर तडजोडी अंती 8 हजार रुपये लाच स्वरूपात घेतांना आज रंगेहाथ पकडण्यात आले.

पैसे घेतांना पकडण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव पंकज विठ्ठल चव्हाण पोलिस शिपाई, ब.न. 6093 , आणि पंकज विलास राठोड पोलिस नाईक ब.न.5125 हे असून दोघांना ताब्यात घेऊन दोन्ही पोलीस असलेल्या आरोपी कर्मचाऱ्यां विरूध्द लाच प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत नागपूरच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात, पोलिस उप अधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कारवाई करण्यात आली.

पुढील तपास यशवंत राऊत पोलिस निरीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली हे करीत आहेत. आष्टी पोलीस स्टेशन यापूर्वी ही अनेकदा सामाजिक दृष्टीने वादग्रस्त ठरले आहे. काही दिवसांपूर्वी याच पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावातील सामाजिक जबाबदारी असलेल्या नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्या बेजबाबदार पोलीस उपनिरीक्षकावर गडचिरोली जिल्ह्य पोलीस अधीक्षक यांनी योग्यरित्या कारवाई करणार का❓ अशा अनेक शंका जनमानसातील चर्चेत ऐकावयास मिळत आहे.

Don`t copy text!