गोंडवाना विद्यापीठातर्फे गडचिरोली येथे सारंग जांभूळे यांचा सत्कार..

335

गौरव लुटे
आरमोरी तालुका प्रतिनिधी

गडचिरोली – महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथील विद्यार्थी सारंग जांभूळे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कोविड योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल आज गोंडवाना विद्यापीठातर्फे गडचिरोली येथे कुलगुरू महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी सर, प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम काळे सर, कुलसचिव डॉ.अनिल चीताडे, एनएसएस संचालक डॉ. श्याम खंडारे, एनएसएस माजी संचालक नरेश मडावी सर उपस्थित होते.