शिक्षक प्रेमी व प्रसारक म्हणून विशाल शेंडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

261

राजुरा: राजुरा तालुक्यातील मुख्य महामार्गावर असलेल्या वरुर रोड या गावातील विशाल शेंडे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत, जेसीआय रॉयल्स राजुराच्या वतीने पी. डब्ल्यु.डी. हॉल बल्लारपूर येथे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा , जिवती कोरपना या तालुक्यातील शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रशस्तीपत्र, वृक्ष,सन्मानचिन्ह प्रदान करून पास्ट एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट जेसी नरेंद्रजी बर्डिया, पास्ट जॉन प्रेसिडेंट जेसी भरत बजाज, झोन ऑफिसर जेसी सुषमा शुक्ला, अध्याय अध्यक्ष जेसी स्मृती व्यवहारे, फाउंडर प्रेसिडेंट जेसी राजूरा रॉयल्स जेसी जयश्री शेंडे , सचिव जेसीआय राजू रॉयल्स २०२१ जेसी सुशिला पोरेड्डीवार , या मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक प्रेमी व प्रसारक म्हणून विशालला २०२१ चा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आले.

वरूर रोड येथे गेल्या दोन ते तीन वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असे नानाविध उपक्रम राबविण्यात आले.विशालने युवा मित्रांच्या सहकार्याने गावात जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती केली. विशालने गावात वृक्षारोपण, स्वच्छ्ता जनजागृती, थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम, कार्यक्रमाचे आयोजन,मतदान जनजागृती, तंबाखू व्यसनमुक्ती पर जनजागृती, एड्स जनजागृती, प्लस पोलिओ लसीकरण सहकार्य, रॅली, तसेच लॉकडाऊन च्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता अनेक प्रयत्न केले, गावामध्ये फवारणी, गरजूंना मोफत मास्क वितरण, सोशल मीडियावर जनजागृती, युवा मित्रांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, स्वतः मजूरीतून मिळालेल्या एक हजार रुपये व मित्रांच्या सहकार्याने मिळालेली १८०० निधी मुख्यमंत्री सहायता निधी व पंतप्रधान सहायता निधीत गोळा, गावात राबविलेल्या कोरोना आरोग्य तपासणी शिबिर तसेच कोरोना लसीकरण सेंटरवर सहकार्य, विद्यार्थ्यासाठी मोफत शिक्षण, इंदिरा विद्यालय वरुर रोड येथील शिक्षकांनी दिलेली शिक्षक मित्राची जबाबदारी पूर्णत्वास नेऊन गावातील विद्यार्थ्याकडे लक्ष देण्याचे कार्य केले याच कार्याची दखल घेत विशालला २०२१ चा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सध्या विशालचे शिक्षण डॉ. आंबेडकर कॉलेज चंद्रपूर येथे सुरू आहे. श्री, शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे शिकत असताना याच सामाजिक कार्याची दखल घेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त व महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र विभागातर्फे राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार जाहीर सुध्दा झालेला आहे.

विशालच्या या यशाबद्दल त्याला नेहमी मार्गदर्शन करणारे श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड साहेब प्रा. गुरुदास बल्की, गावातील विद्यार्थी मित्र, आई वडील यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या