जिमलगट्टा गावाचे स्वच्छता व विकासाकडे वाटचाल…

428

हरीश मंगाम जिल्हा प्रतिनिधी गड.

अहेरी तालुक्यातील जिमलगठ्ठा येथे
९ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावातील प्रतिष्ठित नागरिक इतर गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात ९ /८/२०२१ते १४/८/२०२१ पर्यंत ग्रामस्वच्छता अभियान सप्ताह पाडण्यात आले. या अभियानांतर्गत गावात प्रत्येक घराची वैयक्तिक स्वच्छता व गावातील रस्त्याची स्वच्छता तसेच नाल्याची स्वच्छता करून घेण्यात आली. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे गावात इकडे तिकडे अस्वच्छता रस्त्याची दुरावस्था व संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य होते त्यामुळे गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी गावात स्वच्छतेची मोहीम राबवण्याचा प्रस्ताव घेऊन येथील उप पोलीस स्टेशन मध्ये गेले असता तेथिल प्रभारी अधिकारी पोउपनि श्री देवानंद बगमारे यांनी मा . उपविभागीय पोलीस अधिकारी सा . श्री राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन घेऊन गावक – यांना गाव स्वच्छते करिता आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे हमी देवून ग्राम स्वच्छता अभियान की पूर्ण रूपरेषा आखून दिली . गावातील लोकांमध्ये स्वच्छते प्रती जागृती करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात आले यात श्रमदान वृक्षारोपन , आरोग्य शिबीर व महिलांकरिता रांगोळी स्पर्धा इत्यादीचा समावेश होता . गावात रस्त्यावर चागले मुरूम टाकुन खड़े भरण्यात आले व रस्त्यांना सुशोभित करण्याकरिता रस्त्याचे दोन्ही बाजूला विविध वृक्ष लावण्यात आले . मुरूम च वृक्ष लागवड करिता येथिल एफ.डि.सी.एम. चे आरएफओ अजस्त्रा सा . व वनविभागाचे आर एस ओ श्री नगराळे सा . यांचे मोलाचे सहकार्य लाभले . तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मेडी मॅडम यानी आरोग्य शिबीर मध्ये मोलाचे । योगदान दिले . अशाप्रका गावात स्वच्छते करिता ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले असून या सप्ताह दरम्यान गावातील ज्या गावक – यानी स्वच्छतेच्या बाबतीत उत्कृष्ट प्रदर्शन केले त्याना प्रोत्साहनार्थ विविध बक्षिस गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून ठेवण्यात आले होते . बक्षिस वितरण मध्ये गावातील सरपंच पंकज , उपसरपंच मेडो , ग्रामसेवक सिराय डॉ.उपगंधलवार , डॉ . श्री.उपगनलावार श्री संजय गज्जलवार श्रीनिवास गुडमेलबार श्री.मुझदा दुर्ग चंदु जल्लेवार , श्री.अशोक गज्जमदार श्री.रानु ओल्लेट्टीवार श्री सुधाकर रापीबार श्री.प्रभाकर पादावार श्री . महेश उल्लीपवार श्री राजेश सोनी , श्री . सागर पद्मगंटीवार , श्री . क्रिष्णा शानगोंडावार , श्री . विक्रम सिंग बिकानेर श्री . हरिपत मंडल राम कितीचार सावकार तिरुपती किती वार नाम श्री.महेश मदेलाचार यांचे मोलाचे सहकार्य लाभले जिमलगट्टा गावातील समस्त गावकरी , पोलीस विभाग वनविभाग , आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत या सर्वांनी मिळुन कार्यक्रम यशस्वी केले .