HomeBreaking Newsधक्कादायक घटना ! लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने गळा आवळून केली हत्या...

धक्कादायक घटना ! लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराची प्रेयसीने गळा आवळून केली हत्या…

प्रतिनिधी (दिलीप सोनकांबळे)

पिंपरी(पुणे): लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी प्रेयसीला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना चिंचवड येथील व्हाईट हाऊस लॉज येथे घडली आहे. पैगंबर गुलाब मुजावर असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो विवाहित असल्याची माहिती समोर येत आहे. मुजावर हा ३५ वर्षांचा होता. याप्रकरणी २९ वर्षीय प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. मयत व्यक्तीच्या पत्नीने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजावर आणि २९ वर्षीय तरुणी हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. दोघांची चांगली मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात बदलले.
मुजावर हा विवाहित होता, तर २९ वर्षीय तरुणी मुजावरच्या प्रेमात आंधळी झाली होती. ही तरुणी मुजावरसोबत विवाह करण्यास उत्सुक होती. मात्र, विवाह करण्यास मुजावरने नकार दिला. यावरूनच दोघांमध्ये खटके उडाले त्यांच्यात वाद झाले.

दरम्यान, प्रेयसीने मुजावरला चिंचवडमधील व्हाइट हाऊस लॉजवरील ३०७ क्रमांकाच्या रूममध्ये भेटण्यासाठी बोलावले. सायंकाळी सहाच्या सुमारास दोघांची भेट झाली. त्यांच्यात वाद झाले. वादादरम्यान मुजावरने लग्नास नकार दिल्याचा रागातून प्रेयसीने ओढणीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर या तरुणीनेच मुजावर हा बेशुद्ध पडला आहे अशी माहिती तेथील कामगारांना दिली. तातडीने मुजावरला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी प्रेयसीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!