आरमोरी येथे भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण.

490

गौरव लुटे
आरमोरी तालुका प्रतिनिधी

आरमोरी- आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झालीत. सगळीकडे तिरंग्याला सलामी देऊन ध्वजारोहण करण्यात आले. गेली दिड- दोन वर्षे कोरोनामुळे झेंडावंदन झाले नाही. पण यावर्षी मुभा मिळाल्यामुळे ध्वजारोहण करण्यात आले.
दरवर्षी आपण फक्त नुसतं ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन साजरा करत असतो. या वर्षाला कोरोनाच्या महामारीमुळे आप्तस्वकीयांना आपण तर गमालेचं सोबत आॅक्सिजन च्या कमतरतेमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. बांधवांनो ऑक्सिजनचे नैसर्गिक स्त्रोत झाडे आहेत.म्हणून आज १५ ऑगस्ट स्वांतत्र्यदिनानिमित्त सारंग जाभूळे यांच्या नेतृत्वात वडसा रोडवर वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपण करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे मा.प्रा. चव्हाण सर, मा.प्रा.सोनटक्के सर आणि स्वयंसेवक वेणू दोनाडकर, पूजा प्रधान , निकेतन सोरते,विशाल जौंजालकर उपस्थित होते.अश्या जिवनदायी वृक्षांना आपण आपल्या परिसरात लावून पर्यावराणाप्रती आपली जबाबदारी पार पाडली पाहिजेत असा महत्त्व पूर्ण मोलाचा संदेश सर्वांनी यातून दिला.