गोंडपिपरी: कलावंताना प्राचीन काळापासूनच सन्मान दिल्या जात नव्हते.मात्र या कलावंतांनी प्रत्येक काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपल्या लेखणीतुन प्रहार केले आहेत. आज भारत देशाचा जो काही विश्वसनीय इतिहास आहे ते या कलावंतानी लिहून ठेवलेल्या साहीत्यकृतीतून घेण्यात आलेला आहे. यात शिल्पकार,लेखक,कवी,नाटककार यांच्या समावेश आहे. प्रत्येकच सरकार या कलावंताना पाण्यात बघते….! महाराष्ट्रात झाडीपट्टी रंगभुभी नावाजलेली आहे. या भुमित आपल्या लेखन शैलीलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे नाटककार ताराचंद उराडे हे गोंडपिपरी तालुक्यातील तारसा या गावातील होते. त्यांचे अनेक नाटके रंगमंचावर सादर झालेली आहेत. त्यांना डेग्यू आजार झाला होता. उपचारासाठी मदतीची गरज होती. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राजकूमार भडके यांनी आव्हान केले होते.सामाजिक बांधिलकी जोपासणार्यांनी मदतीचा हात पुढे केला. मान्यवरांनी केलेल्या मदतीतून त्यांचावर उपचार सूरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे आज निधन झाले. त्यांचा अवेळी जाण्याने झाडीपट्टी रंगभुमीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या गोंडपिपरी तालुक्याचे नाव उंचविणाऱ्या या कलाकाराला भावपुर्ण श्रध्दांजली….